NRS Hospital

वजन कमी करणे: सत्य आणि असत्य

वजन कमी करणे: सत्य आणि असत्य

 • June 28, 2022
 • 0 Likes
 • 670 Views
 • 0 Comments

इंटरनेटवर वजन कमी करण्याच्या टिप्स आणि युक्त्यांबद्दल खूप माहिती आहे आणि आजूबाजूला बरेच सल्लागार आहेत. खरी माहिती अनेकदा मार्केटिंग डावपेचांनी भरलेल्या चुकीच्या माहितीच्या गोंधळात  लपलेली असते. आज आम्ही तो  गोंधळ थोडासा दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि वजन कमी करण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे जे नेहमीच खरे राहतील ते समोर आणण्याचा प्रयत्न करात आहोत .

तुम्हाला खरंच काही किलोग्रॅम कमी करण्याची  गरज आहे का?

हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. प्रथम बीएमआय तपासणे आवश्यक आहे, ते सुमारे 19 ते 24 च्या दरम्यान असावे आणि जर ते आधीच या श्रेणीच्या खालच्या टोकाकडे असेल तर पुढील वजन कमी होणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असेल. बीएमआय म्हणजे शरीराचे वजन(किलो मधे) भागिले उंचीचा(मीटर मधे ) वर्ग.

दंतकथा!

वजन कमी करने वगेरे हे एक मोठा धंदा आहे त्यामुळे वजना  बद्दल खुप साऱ्या दंतकथा अणि गैरसमज पसरविले जातात . वजन कमी करण्याच्या घरगुती पद्धती, विविध आयुर्वेदिक किंवा अ‍ॅलोपॅथिक औषधे, विविध  कंपन्याचे उत्पादने सांगितली जातात, परंतु अॅलोपॅथी फिजिशियन  म्हणून ज्याची आम्ही प्रैक्टिस करतो आम्ही कोणतेहि औषध किंवा उत्पादनाचा सल्ला देत नाही। कारण तसे काहीही उपलब्ध नाही (काही औषधे आहेत परंतु अनेक दुष्परिणामांसह कोणतेही स्पष्ट फायदे नाहीत).

मी येथे काही समज सांगू इच्छितो:

 • ग्रीन टी तुमचे वजन कमी करणार नाही, उलट सर्व प्रकारचा चहा टाळा.
 • सकाळी लवकर कोमट पाणी पिल्याने काहीही होणार नाही.
 • अत्यंत उपासमार किंवा अत्यंत व्यायाम या गोष्टी टाळा.
 • वजन कमी करण्याचा आहार! नाही, तस काही नसत ! संतुलित आहाराचेच तुम्ही नेहमी पालन केले पाहिजे.
 • डिटॉक्स बॉडी! माफ करा तुमच्या शरीरात विषारी काहीही नाही.
 • आणि आणखी बरेच आहेत! कृपया डॉक्टरांचा (एमबीबीएस एमडी मेडिसिन) सल्ला घ्या आणि वजन कमी करतो म्हणणाऱ्या स्वयंघोषित तज्ञांचा सल्ला घेऊ नका.

सत्य!

हे सर्व कॅलरी सेवन अणि कॅलरी बर्न बद्दल आहे? रॉकेट सायन्स नाही!

मूळ तत्वतुम्ही खाण्यापेक्षा जास्त बर्न करा’. आता त्यासाठी दोन मार्ग आहेत:

  1. सेवन कमी करा! वजन कमी होत असल्याचे लक्षात येईपर्यंत प्रत्येक आठवड्यात तुम्ही खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी करा. दर आठवड्याला ½ ते 1 किलो वजन कमी होने आवश्यक।संतुलित आहार जसे कर्बोदकांमधे चपाती, तांदूळ, प्रथिने (मसूर/डाळ), चरबी (तेल/लोणी) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये (भाज्या/दूध/अंडी) भरपूर पाणी घेणे आवश्यक आहे. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा जेणेकरून तुमचे पोट लवकर भरेल आणि आपोआप तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होईल आणि सोबत पाण्याचे प्रमाणही वाढवा.

कॅलरी कमी करण्यासाठी किंवा फायबरचे सेवन वाढवण्यासाठी टिप्स:

  1. मिठाई टाळा.
  2. तुमचा आहार 4 लहान जेवणांमध्ये विभागून घ्या आणि त्या दरम्यान भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हाला भूक लागणार नाही.
  3. जर 4 लहान जेवण शक्य नसेल तर, दिवसातून 2 जेवण घ्या, भरपूर पाणी घ्या अणि  चहा किंवा नाश्ता किंवा मिष्टान्न मधे मधे घ्यायला नको.
  4. पीठ चाळू नका।  रोट्या किंवा चपात्या बनवताना.
  5. रोटी किंवा भातापेक्षा जास्त भाज्या खा.
  6. आहारामधे अनसॅच्युरेटेड फॅट्स असले पाहिजे म्हणजे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, ऑलिव्ह तेल.
  7. सॅच्युरेटेड फॅट्स टाळा जसे पाम तेल, खोबरेल तेल, लोणी/तूप, तळलेले पदार्थ यांसारखे.

2. जास्त बर्न करा! तुमचे सध्याचे आहाराचे वेळापत्रक जे काही आहे, तेच ठेवा आणि ‘संतुलित आहार’ ठेवताना दर आठवड्याला ½ ते 1 किलो वजन कमी होत असल्याचे लक्षात येईपर्यंत व्यायामाची तीव्रता  हळूहळू वाढवा. व्यायाम म्हणून खेळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. वेगाने  चालणे (या प्रकारच्या चालण्यासाठी अधिक स्नायू गुंतलेले असतात) हे हळू चालणे किंवा हळू धावने यापेक्षा जास्त चांगले आहे. कॅलरी मोजनी बद्दल कधीही काळजी करू नका!

3. दोन्ही एकत्र करा! जर लक्ष्य खूप दूर असेल तर बहुतेक वेळा दोन्ही एकत्र करणे आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा यासाठी  ‘कोणतेही शॉर्टकट नाहीत’.

तज्ञांच्या सल्ल्यासाठी तुमच्या ‘जनरल फिजिशियन’ (एमबीबीएस एमडी मेडिसिन) चा सल्ला घ्या. एक जनरल फिजिशियन असा व्यक्ति आहे जो मानवी शरीरविज्ञान, रोगाची प्रगती आणि त्याचे उपचार विशेषतः जीवनशैलीशी संबंधित विकार समजून घेतो आणि वजन कमी करण्याच्या सल्ल्यासाठी सर्वात अनुकूल असतो.

 • Share:

Leave Your Comment